काकडे पॅलेस मंगल कार्यालय भागवत सप्ताहासाठी दुपारी तीन वाजता उघडेल. पहिल्या काही रांगा या राखीव असतील.
चपला, बूट ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था नाही; आपण आपल्याबरोबर त्यासाठी एक पिशवी बाळगावीत. भागवत कथा ऐकायला येताना भारतीय पोषाख परिधान करावा, ही विनंती.
पावसाचे दिवस असल्याने रेनकोट, छत्री लागू शकते. ओली छत्री, रेनकोट ठेवण्यासाठी व्यवस्था असेल; मात्र आपापल्या जबाबदारीवर ती ठेवावीत.
येणाऱ्या सर्वच श्रद्धेय भाविकांना जागा मिळायला हवी. आपण रुमाल, पर्स ठेवून कोणाचीही जागा आरक्षित करू नये. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल, हे लक्षात घेऊ.
पाण्याची बाटली आणि स्वतःचे आसन जरूर जवळ ठेवावे. तसेच, निरुपण ऐकण्यासाठी येताना कुठलेही खाद्यपदार्थ जवळ बाळगू नयेत, ही विनंती.
काकडे पॅलेस मधील लीलावती सभागृहामध्ये ५५० खुर्च्यांची आणि काही प्रमाणात भारतीय बैठकीची व्यवस्था आहे. सभागृहात दोन स्क्रीनसुद्धा लावले असतील. या सभागृहात बसून निरुपण ऐकणाऱ्यांनी बेसमेंट मधील वॉशरूमचा वापर करावा, ही विनंती. तसेच, वरील बाजूस पहिल्या मजल्यावरील विक्रम हॉल येथेही निरुपण ऐकण्याची व्यवस्था केली असून तिथे एक स्क्रीन लावलेला असेल. तेथील आसन व्यवस्था साधारण ४५० पर्यंत असेल आणि तिथे वॉशरूम व्यवस्थाही उपलब्ध आहे. एकूणच हलचाल टाळून कधी आपणास उठावे लागले तर इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ.
आपल्या वाहनाने येणार असाल तर फारशी अडचण नाही, पण बाहेरच्या वाहनाने येणार असाल तर परत जातानाही वाहन आरक्षित करून ठेवणे चांगले राहील.
सौ. धनश्रीताई यांना भेटण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी कोणीही पहिले सहा दिवस थांबू नये; समाप्तीचे दिवशी आदरणीय सौ. धनश्रीताई आरती नंतर थोडा वेळ थांबणार आहेत, तेव्हा आपल्याला त्यांची भेट घेता येईल. त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे मोबाईल कॅमेरा चित्रीकरण करू नये व फोटो काढण्याचा आग्रह धरू नये.
आरती झाल्यावर पहिल्यांदा सौ. धनश्रीताई सभागृहातून बाहेर येतील आणि नंतर क्रमाक्रमाने दोन्ही सभागृहामधील भाविक बाहेर येतील. या सर्व काळातही शांतता राखू.
मुख्य सभागृह म्हणजेच लीलावती सभागृह वातानुकूलित आहे, त्यामुळे गरजेनुसार स्वेटर किंवा शाल बाळगावी.
निरुपण ऐकताना कोणत्याही साधनाद्वारे (device) face book live, व्हिडिओ चित्रीकरण, ध्वनीमुद्रण अश्या कुठल्याही प्रकारचे दृक-श्राव्य मुद्रण करण्यास प्रतिबंध आहे.
आपल्या सहकार्याने श्रीमद् भागवत कथा सप्ताह आपल्या सर्वांसाठीच एक श्रवणीय आणि समाधानाची पर्वणी ठरेल, हा विश्वास आम्हाला आहे.