आमच्या व्यवसायाला आवश्यक कोणत्याच वस्तूंचे भाव स्थिर नसल्यामुळे, भाव कायम वाढतच असल्यामुळे आमचे दर नक्की करणे अवघड जात आहे. गुणवत्तेत तडजोड करायची नाही, हे नक्की आहे. त्यामूळेच आपल्याला दिलेले दरपत्रक बदलू शकते, कार्याचे दिवशीचे दर पत्र कार्याचे वेळी धरले जाते, याची कृपया नोंद घ्यावी.
1. बुकिंग पध्दत : सुपर्णचे आरक्षण करताना ॲडव्हान्स बुकिंग रक्कम ₹ १,००,०००/- (रोख / ऑनलाईन / चेकने) व बाकीची उर्वरित रक्कम कार्याचे आधी २० दिवस ते १ महिना अगोदर द्यावयाची आहे.
* केटरिंग व्यवस्थापन 'त्रिविक्रम उद्योग' (जोशी-गोखले) यांचेच असते.
2. बुकिंग रद्द करणे : विवाह / व्रतबंध अशा मोठ्या कार्याचे बुकिंग रद्द करण्याचे नक्की झाल्यावर त्वरित बुकिंग रद्द करणे बाबतचा अर्ज मूळ पावती सह आमचेकडे द्यावा. हे बुकिंग अन्य कोणी बुक केले अथवा बुकिंग तारीख मोकळी राहिली तरी देखील ₹ ५०,०००/- (Cancellation Charges ) कापून उर्वरित रक्कम १ महिन्याने मिळेल.
3. बुकिंगमधे बदल : विवाह / व्रतबंध अशा मोठ्या कार्याचे बुकिंग बदलण्यासाठी (उपलब्धतेनुसार) किमान ₹ 25,000/- वेगळे द्यावे लागतील.
4. कृत्रिम फुलांचे अथवा ताज्या फुलांचे डेकोरेशन हे सभागृहाच्या व्यवस्थापनाने निश्चित केलेल्या एजन्सीकडूनच जादा आकार देऊन सुपर्ण मार्फतच करावे लागते, याची नोंद घ्यावी. बाहेरील एजन्सी कडून फुलांची सजावट करून घेता येणार नाही. तसेच बाहेरील इव्हेंट मॅनेजमेंट सर्विससाठी व्यवस्थापनास परवानगी देता येणार नाही.
5. मेनू व इतर तपशील ठरविण्यासाठी २० दिवस आधी फोन करून भेटण्यास यावे तसेच येण्यापूर्वी घरी चर्चा करून यावे, ही विनंती. त्यावेळी उर्वरित रक्कम भरावी, ही विनंती.