
पुरुषोत्तम मासानिमित्त जोशी-गोखले परिवारातर्फे 'श्रीमद् भागवत कथा सप्ताह ज्ञान यज्ञ' काकडे पॅलेस, कर्वेनगर येथे, रविवार दिनांक ७ जून २०२६ ते शनिवार दिनांक १३ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या भागवत कथा साप्ताहास आदरणीय विदुषी डॉ. धनश्रीताई लेले या निरुपणकार म्हणून लाभल्या आहेत. निरूपणाची रोजची वेळ दुपारी ४:०० ते ८:०० असेल. रोज दुपारी ३:३० वा. विष्णुसहस्रनामाचे पठण सुरू होईल आणि त्यानंतर ३:५५ वा. आदरणीय सौ. धनश्रीताई यांचे आगमन, औक्षण आणि दीपप्रज्वलनाने निरुपणास सुरुवात होईल. रात्री ८:०० वाजता आरतीने त्या-त्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होईल. जोशी-गोखले परिवार म्हणजेच 'त्रिविक्रम उद्योग - शुभसमारंभाचे संयोजक' हा उद्योग गेली ६३ वर्षे दर्जा राखून आणि साजेसे नवीन बदल आपलेसे करत नावारूपाला आलेला उद्योग आहे. आम्हाला ज्या समाजाने भरभरून दाद देत शुभकार्याचा अविभाज्य भाग आनंदाने करून घेतले, त्या समाजाविषयीची कृतज्ञता म्हणून श्रीमद् भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यात कोणतेही व्यापारीकरण नाही. निरुपणकार सौ. धनश्रीताई यांच्याकडून भागवत कथा श्रवण करण्याची उत्तम संधी आपल्याला सगळ्यांना मिळत आहे. गर्दीचा अंदाज घेत व्यवस्थापन उत्तम राखण्याचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित धरलेले आहे.